Saturday 5 August 2017

एक नसलेलं love triangle: भाग ५

एक नसलेलं love triangle: भाग ५

परीक्षा जवळ आली, अभ्यास चालूच होता आणि त्याचा नंबर माझ्या पुढे पडला होता. तो जवळ होता, बरं वाटत होतं. साईडला सायलीचाहि नंबर होताच. दोघांचं नशीब चांगलं होतं. परीक्षेवेळीही एकत्र होतीत. सायली तर त्याचा पेपर रोज छापत होती. मला आता याची सवय झाली होती. रोज वाटायचं कि काहीतरी त्याला विचारू पण नंतर कशाला उगीच असं वाटायचं.

परीक्षा संपली आणि थोडे दिवस सुट्टी पडली. दरवेळी सुट्टी म्हणजे छान वाटायचं पण यावेळी सुट्टीमध्ये करमत नव्हतं. त्याला रोज बघून सवय झाली होती. आता खूप दिवस त्याला बघायला मिळालं नव्हतं. इच्छा फक्त त्याला बघायची होती मग भलेही आमची मैत्री नसलीतरी चालेल पण तो दिसावा, बस.

असच एक दिवस मी घरचा छोटा बाजार करायला बाहेर आले, साध्या कपड्यांमध्ये. छोटंसं ते दुकान, आत गेले आणि पाहते तर काय नेमका तो मूर्ख तिथे होता, शी किती uncomfortable feel करत होते मी. घरी घालणाऱ्या साध्या ड्रेस मध्ये त्याला मी दिसले. तो काय विचार करत असेल काय माहित. मी माझं सामान घेतलं आणि पैसे देऊन बाहेर पडायला निघाले. अचानक मला माझ्या नावाची हाक ऐकू आली. seriously त्याने मला हाक मारली होती! २ मिनिटे मला तर वाटत होते मी स्वप्नातच आहे. पण लगेच भानावर आले. त्याने पेपर कसे गेले विचारलं होतं. मी "छान गेले" म्हणून तोच प्रश्न त्यालाच विचारला. त्याने छान न म्हणता chemistry चा पेपर अवघड गेला असं म्हंटला. बर झालं तो तसा म्हंटला, कारण असं म्हंटल्याने आमचं बोलणं थोडं वाढलं. नाहीतर नुसतं "छान" म्हंटला असता तर पुढे काय बोलायचं हे मला कळलं नसतं.

अश्या पद्धतीने मी त्या uncomfortable situation मधेही खुश झाले आणि हसत हसत घरी गेले.


:अक्षय गुजर

Wednesday 26 July 2017

एक नसलेलं love triangle: भाग ४

एक नसलेलं love triangle: भाग ४

तिच्याशी बोलून खूप महिने झाले, माझं फक्त तिला चोरून बघणंच चालू होतं. आम्ही आमचा ग्रुप मज्जा मस्करी करत बसलो होतो आणि अचानक सायली एक बातमी घेऊन आली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर १२ वाजले. ती बातमी म्हणजे परीक्षेची. परीक्षा आलेली समजताच सगळ्यांचं वेळापत्रक बदललं. माझंही वेळापत्रकानुसार चालू होतं. असच एक दिवस क्लास मध्ये जाता-जाता कॉलेज चा शिपाई नोटीस बोर्ड वर काहीतरी लावताना दिसला. तो काय लावत आहे हे बघण्यासाठी मी तिथे गेलो. तो परीक्षेचे नंबर लावत होता. मी माझा नंबर पहिला आणि मनातच पाठ करत पुढे चाललो. पण लगेच वळलो आणि तिचा नंबर शोधला आणि त्यादिवशी मला देवाकडून एक सरप्राईझ मिळालं. माझ्या मागेच तिचा नंबर पडला होता. चला, आता आम्हाला परीक्षेच्या कारणाने बोलायला मिळणार हे नक्की होतं. त्या उत्सहात मी अभ्यास करू लागलो.

परीक्षेच्या दिवशी मी माझ्या सीट वर जाऊन बसलो. थोड्यावेळात ती तिच्या मैत्रिणीसोबत आली. ती आल्या-आल्या तिच्याशी बोलायचंच अशी खूणगाठ मारून आलेला मी तिच्या मैत्रिणीला बगताच खाल मानघालून बसलो. पेपर च्या वेळी बोलणं घडेल. साईडला सायलीचा नंबर होता, माझ्या ग्रुप मधील एक तरी मेंबर माझ्याजवळ होतं याचादेखील बरं वाटत होतं. पेपर चालू झाला आणि बघता बघता २ तास संपले देखील. पण तिने काहीच नाही विचारलं मला. आणि मलाही काही विचारता आलं नाही. सायलीला उत्तरं दाखवताना मी तिच्याकडे बगायचो पण ती पेपर लिह्ण्यातच मग्न. बघता बघता परीक्षा संपली पण आमचं बोलणं काय झालंच नाही.

मला काहीच येत नाही अशी भावना मनात घर करायला लागली. क्लास मधल्या कुठल्याही मुलगीही बेधडक बोलू शकतो पण तिच्याशीच बोलायला का जमत नाही कळत नव्हतं. ती मला कधीच मिळणार नाही हे मला आता समजत होतं.

:अक्षय गुजर

एक नसलेलं love triangle: भाग ३

एक नसलेलं love triangle: भाग ३

२-३ महिने उलटून गेलेले आणि त्याच माझ्याकडे बघणंही कमी आलेलं. पण एवढ्या दिवसात मी त्याच्याकडे खूपच आकर्षित झालेले. त्याच वागणं आता खूपच impressive होत होतं. त्याची सगळ्यांशी बोलायची पद्धत, त्याच वागणं, वर्गात सरांशी कोणत्यातरी मुद्द्यावर घातलेला चर्चत्मक वाद, कोणाचंतरी bday सेलेब्रेशन, लीडरशिप अश्या त्याच्या कितीतरी गोष्टीने मी इंप्रेस होतं होते.

पण या सगळ्याचा तोटा देखील होतं होता. क्लास मध्ये आता सगळ्यांचे ग्रुप झाले होते, त्याचाही एक ग्रुप झाला होता. आणि मला माझ्या मैत्रिणीच्या गॉसिप मधून कानावर पडलं कि त्याच आणि सायली नावाच्या मुलगीच काहीतरी चालू आहे. आता सायली हि त्याच्याच ग्रुप मधली. हे समजल्यावर मन आतून मेल्यासारखं झालं. कधी कधी नको नको त्या गोष्टी घडत असतात आणि आपण काहीच करू शकत नसतो तेंव्हा खूप वाईट वाटत. खूप राग यायला लागला त्याचा. त्याच तोंड सुद्धा बगायची इच्छा होतं नव्हती. उठता बसता फक्त त्याचाच विचार होतं होता. असा का वागला तो असं सारखं मनाला वाटत होतं. पण नंतर समजलं कि तो काहीच चुकला नव्हता. तो आपल्याकडे सुरवातीला बघत होता म्हणून त्याने दुसऱ्या मुलगीवर प्रेम करायचेच नाही काय? आणि मुळात सुरवातीला आपल्याकडेच तो बघत होता हे कश्यावरुन? कदाचित आपणच करून घेतलेला तो गोड-गैरसमज असावा. मनाला समजवलंआणि जे आहे ते accept केलं. कदाचित याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे कारण विचार करणं खूप होत होतं आणि परीक्षा देखील जवळ येत होती.

आता त्याच्यावरचा राग निवळला होता आणि काळजी वाटून राहिली होती. सायली मला सगळ्या मुलांशी close friend वाटायची. पण ती त्याला फसवणार तर नाही ना? अशी उगाचच कारण नसताना काळजी वाटायला लागायची. अभ्यास करताना त्या दोघांना आठवायचे आणि नको ते विचार करत बसायचे. वेडी होती मी. काही कळत नव्हतं काय चाललंय आपल्या आयुष्यात.

:अक्षय गुजर

Monday 24 July 2017

एक नसलेलं love triangle: भाग २

एक नसलेलं love triangle: भाग २

कॉलेज चालू होऊन २-४ दिवस झाले असतील, कुठेतरी ५-६ बाक बसतील एवढेच मुले-मुली येत होते. इथून मागचं शिक्षण सगळं मुलांच्याच शाळेत घेतलेलं. क्लास मध्ये मुली पहिल्यांदाच बघायला मिळाल्या. त्यामुळे हे दिवस माझ्यासाठी गोंधळून जाण्यासारखेच होते. एवढ्या मुली बघून शिकवणीकडे लक्षच लागत नव्हतं.

त्यात मला ती दिसली. तिला बघून मनामध्ये काहीतरी वेगळीच हालचाल झालेली अनुभवली. मला समजण्यापलीकडची ती फीलिंग होती. क्लास मध्ये कितीजरी ठरवलं तरी तिच्याकडे बघितल्याशिवाय ऱ्हायचंच नाही. तिला खूप बगुन झालं आणि कळून चुकलं कि आपण तिच्याकडे बघतोय हे खूप जणांना समजलंय. आता कोणालाही न कळता तिच्याकडे बघणं मला यावेळीतरी काय येत नव्हतं. उगाच काय प्रॉब्लेम नको म्हणून मी तिच्याकडे बघणं टाळलं. कारण एक गोष्ट माहित होती कि इतकी चांगली दिसणारी मुलगी आणि आपलं काही शक्य नाही. स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आलो आणि अभ्यासावर फोकस ठेवलं.

१-२ महिने गेले असतील, मी लवकर येऊन माझ्या बाकावर बसलो होतो. अचानक माझ्या कानावर एका मुलगीच आवाज आला. मी वर बघितलं आणि अंगावर काटाच मारला. चक्क ती माझ्या समोर होती. तिला कोणतातरी गणित समजत नव्हतं आणि ते समजून घेण्यासाठी ती माझ्याकडे आली होती. क्षणभर मला काय चाललंय ते कळत नव्हतं पण मी लगेच तिची वही घेतली आणि त्या गणितात माझं डोकं घातलं. सोपं गणित होत ते. तिला ते मी समजवलं आणि सवयीनुसार मी नकळत म्हणून गेलो कि माझ्या नोट्स आहेत त्या तू बग. तिनेही लगेच होकार दिला. मी मग तिला उद्या आणून देईन असं सांगितलं मग ती तिच्या जागेवर निघून गेली. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच रोमांचकारी ठरला. पहिल्यांदा कोणतीतरी मुलगी माझ्याशी बोलली होती आणि ती पण मला आवडणारी. अंगावर रोमांच उडाले होते ते जाता जात नव्हते. त्या दिवशी कोण आला आणि काय शिकवून गेला हे मला समजलंच नाही.

दुसऱ्यादिवशी मी माझ्या नोट्स घेऊन गेलो आणि काय काय बोलायचं हेही ठरवून गेलो. तिला नोट्स दिल्या आणि हसतच म्हंटल "अक्षर कळत का बग", तिनेहि हसतच उत्तर दिलं कि "कळेल मला, माझ्यापेक्षातरी वाईट नसेलच". नोट्स देता-देता मी तिला बोललो कि निवांत परत दे मला काही या लागत नाहीत. असं आमचं संभाषण झालं आणि मी माझ्या बाकावर जाऊन बसलो. कालच्यापेक्षा आज आम्ही खूप बोललो होतो. बरं वाटत होत.

दुसऱ्या दिवशी मी माझ्या मित्रांच्यात उभा होतो आणि अचानक ती येताना मला दिसली. जेंव्हा सर्वानी तिला बघितलं तेंव्हा माझे सगळे मित्र माझी चेष्टा करायला लागले. मला या चेष्टा ऐकायची याआधी सवय नव्हती आणि तशी वेळीहि आली नव्हती त्यामुळे थोडं uncomfortable वाटत होत. आणि अचानक ती आमच्या समोर आली आणि मला डोळ्यानेच बोलवायला लागली. मला काही कळेना काय करावं. असं वाटत होत कि दुर्लक्षच करावं पण करू शकत नव्हतो. ती बोलवतेय असं सगळी मित्र मला खोपरानेच खुणावू लागले आणि मला जायायला भाग पडलं. मी गेलो, तिने मला माझ्या नोट्स परत केल्या. ज्या नोट्स मला वाचायला किमान ५-६ दिवस लागतील त्या हिने एका दिवसात कश्या वाचल्या काय माहित. असं वाटायला लागलं कि काल आपण हिला जबरदस्तीनेच नोट्स दिल्या. कदाचित तिला नको होत्या पण आपलं मन राखण्यासाठी तिने काल घेतल्या असाव्या. पण हिने नको त्यावेळी मला बोलवलं. मित्र नसताना बोलवलं असत तर २ वाक्य मला बोलायला मिळाली असती. पण याबाबतीत ती बिनडोक निघाली. मी माझ्या नोट्स घेतल्या आणि परत गेलो. obviously मला परत सगळ्यांनी चिढवलं. त्या चिढवण्याचा मला राग नव्हता, मला तिच्याशी बोलायला नाही मिळालं याचा राग होता.

हातची बोलायची संधी घालवली. नंतर मी खूप प्रयत्न केला बोलायचा, खूप शक्कल लढवायला बघितली, पण मला काही जमलं नाही. माझ्यात तेवढं धाडस नव्हतं. घाबरत होतो मी, कशाला घाबरायचो माहित नाही पण घाबरायचो. निदान आमची मैत्रीतरी व्हावी असं वाटत होत पण...

१ महिना झाला, माझ्याकडून काहीच झालं नाही. या एका महिन्यात मी तिला फक्त चुरून चुरून बघितलं, कोणालाही न कळता. आतापर्यंत हि कला मला अवगत झाली होति. ती खूप चुणचुणीत, मस्तीखोर, फ्रेश दिसायची तर कधी नाराज, हरलेली दिसायची. तिच्या मनाचा कायच थांगपत्ता मला लागत नव्हता. 'ती कशी दिसते?' हे मला सांगता येणं खरंच कठीण आहे.

:अक्षय गुजर

Friday 21 July 2017

एक नसलेलं love triangle: भाग १

एक नसलेलं love triangle: भाग १

तसा तो माझ्या वर्गातलाच, सगळ्यात हुशार नाही पण मॅथ्स मध्ये खूपच हुशार. तो दिसतो कसा हे मुलींसाठी कधीच मॅटर करत नाही पण तो माझ्याकडे चोरून चोरून बघतो हे मला कधीच कळालेलं. त्यात माझ्या सगळ्या मैत्रिणी, तो कोठूनजरी आला किंव्हा क्लास मध्ये त्याने काहीजरी उत्तर सांगितले तर लगेच सगळ्या त्याची प्रशंसा करत. त्या सगळ्यांना पण कदाचित माहित होत कि तो माझ्याकडे बघतोय आणि मी हि त्याचा विचार करावा म्हणून त्यांचा तो प्रशंसेचा काय तो  प्रयत्न.

पण असो, मीही थोडा थोडा त्याचा विचार करायला लागलीय हे मला खूप वेळानंतर कळलं. त्याच्याशी बोलायची खूप इच्छा होती पण ते जमत नव्हतं. तो तरी काय येतच नव्हता, तो त्याच्या अभ्यासात रमलेला. मला काही राहवेना म्हणून एक दिवस मीच पुढे झाले आणि गणिताचा प्रॉब्लेम समजत नाहीय म्हणून त्याच्याकडे गेले. वास्तविक तो गणिताचा प्रॉब्लेम नव्हताच, माझ्या आयुष्याचा प्रॉब्लेम होता, आणि त्याच्या उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे गेले होते. त्याने गणिताचा प्रॉब्लेम खूप छान समजवलं मला. वर तो त्याच्या नोट्स पण देईन बोलला.

दुसऱ्यादिवशी त्याने लेक्चर चालू होण्याआदि मला नोट्स दिल्या. २-३ वाक्यांचंच काय ते संभाषण आमचं. पण मनाला वेड लावून गेलं. त्याने नोट्स देताना सांगितलं होत कि निवांत दे म्हणून पण मलाच परत भेटायची घाई होती. मी दुसऱ्याचदिवशी त्याला नोट्स द्यायच्या कारणाने त्याला नजरेनेच मुलांच्यातून बोलवलं. घरातून येतेना खूप ठरवलं होत कि काय काय बोलायचं पण तो समोर आला आणि काय बोलणंच नाही झालं. तोहि मूर्खासारखं नोट्स घेऊन परत गेला. २ मिनिट बोलावं असंही नाही वाटलं त्याला.

आता या सगळ्यामध्ये त्याची परत भेट कशी आणि केंव्हा होईल हे ठरवलंच नव्हतं आणि तशी चिन्हेहि दिसत नव्हती. पण काहीतरी जादू होईल आणि परत भेट होईल असं रोज वाटायचं. हि अपेक्षा ठेऊन रोज कॉलेजला जातेय पण अजून काही होत नाही. आज एक महिना झाला पण काही कारण सापडतही नाही आणि तो मूर्ख माणूस पण मला भेटायला काही कारण काढून येत नाही. तिनंच दिवस भेटलो आम्ही आणि दोनच दिवस बोललो पण ह्या दोन दिवसाच्या बोलण्याने माझी महिन्याभराच्या झोप उडवली.